आईला मारल्यामुळे मुलाने केली वडिलांची हत्या

0

 

(Amravti)अमरावती – अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत येथे धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच बापाची हत्या केली आहे. वडिलांनी रागाच्या भरात आईला रात्री मारहाण केल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केला असून, मृतक राजेश श्रीराम मिसाळ वय वर्षे 60 यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी अंकुश राजेश मिसाळ वय वर्षे 30 आरोपी आशा राजेश मिसाळ वय वर्षे 45 या दोघांनाही भातकुली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.