सरकारने ‘सगे सोयरे’ कोण हे निश्चित करावे – उज्वल निकम

0

 

जळगाव- मराठा आरक्षण  MARATHA ARAKSHAN प्रश्नात आपल्या सगे सोयऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली असल्याने त्यातून तोडगा काढणे सरकारला अडचणीचे झाले . ‘सगे सोयरे’ ही मराठीमध्ये मोठी व्यापक व्याख्या आहे.त्यामुळे याची व्याख्या करताना सरकारला जवळचे नातेवाईक की एका गावाचे जवळचे लोक हे निश्चित करून घ्यावे लागेल असे स्पष्ट मत ज्येष्ठ विधिज्ञ ऍड .उज्वल निकम UJVAL NIGAM  यांनी व्यक्त केले.

नातेवाईकांमध्येही मुलाकडील नातेवाईक की, मुली कडील नातेवाईक हे ठरवताना, हा विषय देखील वादाचा विषय होऊ शकतो.यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन ‘सगे सोयरे’ कोणाला म्हणायचे हे निश्चित करावे लागेल,नाही तर या विषयात उगाच काथ्याकुठ होऊ शकेल. ‘सगे सोयरे’ हा शब्द वापरताना जवळचे नातेवाईक असतील तर वापरावा असं ठरूवून घ्यावे लागेल. जोपर्यंत ‘सगे सोयरे’ या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सगे सोयरे या शब्दामुळे आरक्षणाचा गुंता अधिक वाढू शकतो यावर ऍड उज्वल निकम यांनी भर दिला.