विशेष दिनी मराठ्यांना न्याय दिला, म्हणाले एकनाथ शिंदे

0

 

ठाणे THANE – धर्मवीर आनंद दिघेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे Balasaheb Thackeray and Anand Dighe  यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.त्यांच्या आशीर्वादामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाला यश मिळाले. इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता अन्याय न करता आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त त्यांना न्याय दिला अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
हा निर्णय घेण्याचे काम या सरकारने केले याचा मला अभिमान आहे. सर्व समाज न्याय देण्याचे काम केले आहे.
– आनंद दिघे यांनी त्यागी बनून काम केले.आश्रमात आलेला गोरगरीब,दिन दलित कधी खाली हाताने गेलेला नाही. दुखी आलेला माणूस आनंदात हसत मुखाने परत गेलेला आपण पाहिला आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.