Home MAHARASHTRA मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; या तारखेला होणार मतमोजणी

मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; या तारखेला होणार मतमोजणी

0
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; या तारखेला होणार मतमोजणी

 

राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (2 डिसेंबर) मतदान पार पडलंय. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं आज (3 डिसेंबर) होणारी मतमोजणी लांबणीवर पडली आहे. आता मतदारांसह राजकीय पक्षाना तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (The Nagpur Bench of the High Court) मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी २८४ पैकी केवळ २४ ठिकाणी मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. हे मतदान २० डिसेंबरला होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आज म्हणजे ३ डिसेंबरला २ डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार होते. परंतु, उच्च न्यायालयाने त्याला नकार देत सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली

दरम्यान, निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, ज्या ठिकाणी जिल्हा कोर्टात अपील सुरू आहे किंवा जिथे अपिलांचा निकाल लागण्यास उशीर झाला आणि उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी फक्त तीन दिवसांचाच अवधी मिळाला, अशा सर्व ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.