
वर्धा wardha – गेल्या 43 दिवसांपासून ANGNVADI SEVIKA अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी संप सुरू आहे. दररोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अंगणवाडी कर्मचारी करत आहेत.
आज वर्ध्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी टोपली घेऊन आंदोलन केले. आमची रिकामी झालेली टोपली, आमच्या मागण्या मान्य करून टोपलीत भरून द्यावी, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी शिवसेना उबाठा गटाने आंदोलनाला पाठिंबा दिला. लवकरात लवकर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी निहाल पांडे यांनी दिला. यावेळेस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उमेद अभियान महिलांचा मोर्चा
उमेद अभियानाचे कॅडर म्हणून घोषित करण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी प्रहारच्या नेतृत्वात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उमेद अंतर्गत येणाऱ्या महिलांनी भव्य मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधले. प्रहारचे जिल्हाप्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा काढण्यात आला. कामानुसार वेतन वाढ देण्यात यावी, त्यांच्या वैयक्तिक खात्यात वेतन जमा करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राजवीर संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
अमरावती – अमरावती शहरात मुस्लिम बहुल पश्चिम व पूर्व परिसरातील राहणारे पीआर कार्ड व मुस्लिम पश्चिम भागातील भूखंड धारकांना पीआर कार्ड, आणि गरजू गोरगरीब मोल मजूर करणाऱ्यांना घर भाडेकरून ई-क्लासची शासकीय जागा द्यावी, या सह अनेक मागण्यांसाठी राजवीर जनहित संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आंदोलन निवेदन दिले असतानाही अजून पर्यंत कोणत्याचं मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज पुन्हा राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना घेराव घेलणार अशी प्रतिक्रिया राजवीर संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष रहमत खान यांनी दिली.