Home Top News जगातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात!..कोणी दिला इशारा

जगातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात!..कोणी दिला इशारा

0

वॉशिंग्टन Washington  जगातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यासंदर्भात जागतिक इशारा दिलाय. नोकऱ्यांवर गदा येण्यामागे आर्टिफिशयल इंटेलिजन्स ( एआय) हे कारण ठरते आहे. एआयमुळे जगातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात येतील व विकसित देशांना हा मोठा फटका असेल व तेथे ६० टक्के लोकांवर रोजगार गमावण्याची पाळी येऊ शकते वेळ येऊ शकते, असा इशाराही नाणेनिधीने दिलाय.

नाणेनिधीच्या अहवालानुसार, एआय च्या धोक्यातही ज्यांच्या नोकऱ्या वाचतील, त्यांना कमी वेतनावर काम करावे लागणार आहे. एआयमुळे उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे काही क्षेत्रांमधील रोजगार पूर्णपणे कालबाह्य होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एआय आणि मशीन लर्निंग संदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात हा इशारा देण्यात आलाय. एआयमुळे देशा-देशांतील आर्थिक दरी वाढणार आहे. याचे सामाजिक स्तरांवर गंभीर परिणाम होतील. त्यामुळे जगभरातील देशांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा तातडीने विचार करायला हवा व कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे.