विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातोय

0

 

वाशिम(Washim): अजितदादांच्या मागे तेव्हा कोण होतं, शपथ घेण्यासाठी कोणी पाठवलं, त्याचा अजितदादांनी खुलासा केलेलाच आहे.आता अजितदादा आमच्यासोबत आहेत. आज महायुतीचे काम राज्यात चांगले सुरू आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व घटकांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 50 ते 60 वर्षांत जे काँग्रेसने जे केलं नाही ते काम मोदीजींनी दहा वर्षांत केले आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातोय असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.