
नागपूर- राज्यातील ओबीसी समाजाला सरकारने शब्द दिला, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे सांगितलं. ज्या दिवशी शब्द बदलण्याच्या तयारीत सरकार असेल, ओबीसी संघटना आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी जाऊन जनजागृती करू. 3 फेब्रुवारीला नगरला सभा आहे. 7 फेब्रुवारीला चंद्रपुरात मोर्चा आहे.
मनात भीती आणि संभ्रम आहे, पण सरकारने शब्द दिल्याने आम्ही आमचा निर्णय किंवा कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. आम्ही मुंबईला कूच करण्यासाठी प्रतीक्षेत आहे.
सर्वेक्षण सुरू असले तरी यात त्रुटी आहेत, लगेच दुरुस्त करून सर्वेक्षण पूर्ण करावे, रँडम सॅम्पलिंगला मान्यता नाही, वर्गवारी करून सर्वेक्षण करावे. अहवाल टिकणार नाही आणि सरकार तोंडघशी पडेल.कमी कालावधीत सर्वेक्षण होणे अवघड आहे.12 कोटी लोकांचं सर्वेक्षण करणे पाच दिवसांत कठीण असून नागपुरात सर्वेक्षण होणार आहे, आणखी अवधी द्यावा याकडे तायवाडे यांनी लक्ष वेधले. शिंदे समिती बाबत बोलताना,आजही राज्यात एससी, एसटी आणि ओबीसी प्रमाणपत्र देतांना 11 कागदपत्र दिले त्याला मान्यता नाही. निराकरण झाल्यावर जात प्रमाणपत्र दिले जाऊ शकत नाही. आंदोलकांनी वेळ द्यायला पाहिजे यावर तायवाडे यांनी भर दिला.