उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

0

नागपूर – हिवाळी अधिवेशनात तसेच मागील 52 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. आज नागपूर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘विजयगड’ शासकीय बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कडक पोलीस बंदोबस्त आधीच तैनात असल्याने मग उपमुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका या रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. म्हणूण आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविकानी ठिय्या आंदोलन करीत, शिट्ट्या वाजवत सरकारची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला. आहेत.

भगरीच्या पिठाचे झटपट होणारे तोंडुळे | Shankhnaad News #shankhnaadnews #live