आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

0

आमचं सरकार आल्यावर सीमावाद निर्माण झाला नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांनी काहीही केलं नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला. सीमावादाचे आम्ही राजकारण केलं नाही, असे फडणवीस म्हणाले. (Maharashtra Political News) दरम्यान, विरोधक बॉम्ब फोडणार होते. मात्र, त्यांचं फूस्स झालंय. ती लवंगी मिरची पण नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, अशा इशारा त्यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर


नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात सर्वात जास्त मुद्दा गाजतोय तो बॉम्बचा. आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत. वेळ आली की काढू, असा पलटवार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश असल्याचा इशारा दिला होता. त्यालाच फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्याकडे बॉम्ब आहेत पण त्यांच्याकडे लवंगी फटाकेही नाहीत, असा टोला फडणवीसांनी लगावला. तेव्हा आता सत्ताधारी की विरोधक पहिला बॉम्ब फोडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

उद्धव ठाकरे यांच्या मागणीचा ठरावात उल्लेख नाही?


महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे. सीमावादाबाबत काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारची कोंडी झाली. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधानसभेने गेल्या आठवड्यात एकमताने मंजूर केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. कर्नाटकच्या आक्रमकतेला आज ठरावाद्वारे राज्य सरकार प्रत्युत्तर देणार आहे. कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला जाईल. तसेच गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीबाबत कर्नाटकला समज द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली जाणार आहे. मात्र सीमाभाग केंद्रशासित करावा या उद्धव ठाकरे यांच्या मागणीचा मात्र ठरावात तूर्त उल्लेख नाही.

पोहे ट्रँगल्स आणि मशरूम डीप बेंगल्स रेसिपी | Poha Tringles Recipe & Mushroom Bangles Recipe |Epi 62