“त्या शूर्पनखेचे नाक आम्ही कापणार”, राऊतांची जहरी टीका

0

मुंबई : SHIVSENA  शिवसेनेच्या निकालानंतर भाजप आणि उबाठामधील शाब्दिक संघर्ष वाढला असून आता या संघर्षाची पातळीही खालवत असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यावरुन लक्षात येत आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DEVENDRA FADNVIS  हे शूर्पनखा असून त्यांचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही,”, अशी जहरी टीका उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज केली.

फडणवीस यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात. ‘कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशी गर्जना उगाच दिली जात नाही. भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला, असे कुणाला म्हणताना ऐकले आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखे जगायला शिकवले आणि त्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली, असे राऊत म्हणाले. शिवसेना हीच खरी वाघांची सेना आहे. बाबरी पा़डल्यानंतर त्याचे आरोपपत्र एकदा फडणवीसांनी बघावे. राम मंदीर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभे राहिले आहे, असे त्यांना वाटते. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. शुर्पनखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे राऊत म्हणाले.

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत, असे भाजपाला वाटत असावे. त्यामुळे श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील, असेही ते म्हणाले.