भगवे कपडे घातले म्हणजे साधू होत नाही – नाना पटोले

0

ठाणे – भगवे कपडे घातले म्हणजे साधू संत होता येत नाही. रावणाने देखील भगवे कपडे घालूनच सीतेला पळवून नेले होते असा सनसनाटी टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्याना लगावला आहे. भगवान श्री रामाच्या नावाने पैसे लुटणारे हिंदुत्व की भगवान श्री रामाच्या नावाने भक्ती करणारे हिंदुत्व हे समजलं पाहिजे शेवटी सर्व घडामोडीवर लक्ष असल्याने त्यांना जनताच उत्तर देईल. एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसला असताना दिखावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला राम भक्त म्हणणार का? असा सवाल देखील नाना पटोले यांनी विचारला आहे.