पुण्यात पोटनिवडणूक होणार का?

0

 

निर्णय जाहीर

(Pune)पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार का?, (Pune By Poll Election) या प्रश्नाला आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यात पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

(Supreme Court) पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असेही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे गेल्यावर्षी 29 मार्च रोजी निधन झाले. लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ ला संपत असताना एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणे बंधनकारक आहे. नियमानुसार पोटनिवडणूक अपेक्षित होती.

तथापि आगामी लोकसभेची निवडणूक येत्या  काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते.