मंत्री झाले, पण आमदारकीचे स्वप्न भंगणार!

0

(Karanpur)करणपूर-राजस्थानमध्ये सत्तारूढ भाजपला धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. राजस्थानमध्ये अलिकडेच भाजपने मोठा विजय मिळून सत्ता स्थापन केली. यात आमदार नसलेले (BJP leader Surendra Pal Singh TT)भाजपचे नेते सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना मंत्रीपद देण्यात आले. मात्र, आता श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रिंगणात असलेले मंत्री सुरेंद्र पाल सिंह टीटी हे पराभवाच्या छायेत आहेत. पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु असून मंत्री सुरेंद्र पाल सिंह टीटी हे बाराव्याअखेर सात हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. पराभवाच्या छायेत असलेल्या या नेत्याचे मंत्रीपद जाणार की कसे, याकडे लक्ष लागलेले आहे. (Karanpur Election Result)

राजस्थान निवडणुकीत प्रचारावेळी काँग्रेस उमेदवार अन् तत्कालीन आमदार गुरमित सिंह कूनर यांचे निधन झाले त्यामुळे निवडणूक आयोगाने करणपुर विधानसभा निवडणूक स्थगित केली होती. त्यानंतर तेथे पोटनिवडणूक पार पडली. भाजपने मंत्री सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना रिंगणात उतरवले होते, तर काँग्रेसकडून कूनर यांचा मुलगा (Rupinder Singh) रूपिंदर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पोटनिवडणुकीच्या निकालाचा कल भाजपला धक्का देणारा ठरतोय. मतमोजणीच्या बारा फेऱ्या पार पडल्या असून काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंह कूनर यांची आघाडी कायम आहे. त्यांनी आतापर्यंत ६४ हजारांवर मते मिळविली आहेत तर भाजप उमेदवार मंत्री सुरेंद्र पाल सिंह यांना ५६ हजारावर मते मिळाली आहेत.

साडेसात हजारांवर मतांनी पिछाडीवर आहेत. सुरेंद्र पाल सिंह टीटी हे भाजपचे वरिष्ठ आणि अनुभवी नेते मानले जातात. १९९४ मध्येही ते मंत्रिमंडळात होते. यंदा मुख्यमंत्री भजनलाल सरकारमध्ये त्यांना आमदार होण्याआधीच मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा पराभव झाल्यास भाजप काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागलेले आहे.