
(Nagpur)नागपूर – अयोध्येत होणाऱ्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नागपूरही हिरीरीने सहभागी होणार आहे. नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला (Temple in Ayodhya) अयोध्येत मंदिर परिसरात ढोल ताशा वादनाचा मान मिळाला आहे. हे पथक 24 व 25 जानेवारीला अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल ताशा वादन करणार आहे.
एकंदर 111 वादक हे वादन करतील. अयोध्येत रामलल्ला मंदिर परिसरात वादन करताना राम धुन वादनाची खास तयारी पथकाकडून सुरू करण्यात आली आहे.
40 ढोल, 20 ते 25 ताशे, 10 झांज 21 ध्वज यांचा पथकात समावेश आहे. तत्पूर्वी नागपुरात ऐतिहासिक श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात जाऊन हे ढोल ताशा पथक ध्वजवंदन करणार असल्याची माहिती प्रतीक टेटे, शिवगर्जना ढोल ताशा पथक यांनी दिली.