अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आक्रमक

0

 

ठिय्या आंदोलन

(Amravti)अमरावती- अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत.बडतर्फच्या नोटिसा देऊनही जिल्ह्यातील एकही अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या नाहीत हे विशेष. अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन सुरू झाले.

आतापर्यंत चार अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. 2500 अंगणवाडी सेविकांना नोटीस दिल्या आहेत.आजपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा जिल्हा परिषदने दिला होता. मात्र, या विरोधात जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका आंदोलनाला बसल्या. सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांची जोरदार घोषणाबाजी झाली. अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार, आणि मदतनीसला 20 हजार रुपये मानधन व कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याची मागणी असून 4 डिसेंबरपासून जिल्हयातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर असल्याची माहिती (Aruna Deshmukh)अरुणा देशमुख, अंगणवाडी कर्मचारी युनियन, दिलीप उठाने, राज्य अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी युनियन यांनी दिली.