रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

(Nagpur)नागपूर, 8 जानेवारी
कीर्ती फाऊंडेशनतर्फे. कीर्ती किशोर धर्मे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तपोवन कॉम्प्लेक्स येथील श्री विठ्ठल-रूख्मिणी मंदिरात पार पडलेल्‍या या शिबिरात तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतला.

या शिबिरात मृण्मयी एदलाबादकर या मुलीने वयाच्या 18 व्या वर्षी रक्तदान केल्याने सर्वात लहान रक्तदाता म्हणून तिचे कौतुक करण्यात आले. रक्त संकलनाकरिता लता मंगेशकर ब्लड अ‍ॅण्ड कम्पोनंट सेंटर, हिंगणा यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रसिका नारळे यांनी केले.

शिबिराच्‍या यशस्वीतेकरीता प्राजक्ता गंगाखेडकर, हडस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना अडकर आणि कार्यवाह दशरथ वांढरे यांच्यासह किर्ती फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.