तुम्हाला निवडणूक लढायची का? मग अर्ज करा!

0

 

(President of Maharashtra Pradesh Congress Committee, Hon. Nana Patole)महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा.आ.श्री. नाना पटोले यांच्या आदेशाने रामटेक लोकसभा निवडणुक लढायची असलेल्या इच्छुक उमेदवारांनी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करावा असे निर्देश (Mr. Rajendra Mulak)श्री. राजेंद्र मुळक, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुक लढण्याऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दि. ६ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविले आहे.

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालय, गणेशपेठ, नागपूर येथे दुपारी १२.०० ते सायं ५.०० वाजे पर्यंत अर्ज स्विकारला जाणार आहे. अर्जा सोबत इच्छुक उमेदवारांनी आपली संपूर्ण माहिती तथा आता पर्यंत केलेल्या कामांचा तपशिल सोबत जोडणे गरजेचे आहे. असे (Mr. Gangadhar Revatkar)श्री. गंगाधर रेवतकर, उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांनी सांगितले.