शिवसेना चिन्हावर २ फेब्रुवारीला सुनावणी

0

(New Delhi)नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणत्या गटाची, नेमक्या कोणत्या गटाचा पक्षचिन्हावर अधिकार आहे, या प्रश्नाचे उत्तर २ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार असून न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर २ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत फूट पडून शिंदे गट वेगळा झाल्यावर निवडणूक आयोगाने गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निर्णय देत धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावावर एकनाथ शिंदे गटाचा दावा मान्य केला होता. आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता २ फेब्रुवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आह

अपात्रतेवरील निकाल तयार

दरम्यान, (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification Case) निकाल तयार झाल्याचे सांगण्यात येत असून हा निकाल उद्या मंगळवारी किंवा बुधवारी येऊ शकतो, असे अंदाज आहेत. (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar)विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी १० जानेवारीची मुदत दिली आहे.