जागतिक कृषी पर्यटन दिन

0

जागतिक कृषी पर्यटन दिन : १६  मे हा जगभरात “जागतिक कृषी पर्यटन दिन” म्हणून साजरा केला जातो. आज १५ वा जागतिक कृषी पर्यटन दिन आहे. कृषी-पर्यटन चळवळ सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. त्यानिमित्त मुंबईत महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद २०२२ आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अलीकडच्या काळात महाराष्ट्रात कृषी-पर्यटन केंद्रांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. कृषी पर्यटन केंद्रातील आर्थिक तसेच व्यावसायिक संधी ओळखून अनेक तरुण शेतकरी हा मार्ग निवडत असल्याचे दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांमध्ये २२९ हून अधिक कृषी-पर्यटन केंद्रे आहेत.

कृषी आणि ग्रामीण पर्यटन चळवळ ५२८ कृषी-पर्यटन केंद्रांपर्यंत पोहोचली आहे. लहान शेतकरी असो वा मोठे कृषी विद्यापीठ, प्रत्येकजण आता कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू करू शकतो. शेतकर्‍यांसाठी ते उत्पन्नाचे साधन आहे. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आज कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचे महत्त्व वाढताना दिसत आहे.त्यानंतर महिला बचत गटांसाठी खाद्यपदार्थ असतील आणि गावातील कारागिरांनी बनवलेल्या खाद्यपदार्थ असतील. असे व्यापक दृष्टिकोन ठेवून कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचे महत्त्व वाढताना दिसत आहे . २०१८-१९ मध्ये सर्व कृषी-पर्यटन केंद्रांना दिलेल्या चार लाख कृषी-पर्यटक भेटींपैकी पाचशेहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे चौतीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.महाराष्ट्रातील एकूण कृषी पर्यटन केंद्राला ४,१६७ परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. सध्या सुमारे ७०% शेतकरी पदवीधर आहेत. २० टक्क्यांपर्यंत शेतकरी शिक्षित नसले तरी व्यावहारिक ज्ञान भरपूर आहे. अनेक कृषी पर्यटन केंद्र चालक उच्चशिक्षित असल्याने विविध प्रयोग करून पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

कृषि पर्यटनस्थळांचे प्रकार

  • कृषि पर्यटनस्थळांचे काही वैशिष्ट्ये असतात आणि त्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकारदेखील पडतात. काही ठिकाणांना भेट देण्यामागे जर धार्मिक हेतू अधिक प्रमाणावर असतील तर त्या ठिकाणाला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
  • तसेच थंड हवेचे ठिकाण, समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाण, बर्फावरील खेळांसाठी प्रसिध्द ठिकाण अशी विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळे आपणास माहिती आहेत.
  • अशा सर्व प्रकारच्या पर्यटनस्थळांचे महत्त्व बहुधा रिकाम्या वेळातील अथवा करमगूकीच्या दृष्टीने असते.
  • मात्र कृषि पर्यटन स्थळांच्या प्रकारांचा विचार करताना करमणूक किंवा मनोरंजनासह ज्ञान माहिती पुरविणारे स्थळ असादेखील मुद्दा लक्षात घ्यावा लागतो आणि हेच कृषि पर्यटनाचे वैशिष्ट्य होय. कृषि पर्यटनाचे प्रकार त्यावरून पडतात.

जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार समितीच्या निर्णयानुसार यावर्षीचे जागतिक कृषी पर्यटन पुरस्काराचे मानकरी आहेत

 

१. मिनी मुर्रा फार्म – थायलंड – मिस चारिणी चॉयबलार्भ – १५ एकर मुर्रा म्हशींचा गोठा त्या  सांभाळतात. यातील  ४०० म्हशी भारतातून घेऊन निर्यात केलेल्या आहेत. आणि तिथे कृषी पर्यटन केंद्र  सुरु  करत त्यांनी  गावातील महिला शेतकरी यांना मुर्रा म्हशींचा गोठ्यातून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे

२. लिपींग लाम्ब फार्म स्टे – ओरेगॉन राज्य , अमेरिका येथील  मिसेस स्कॉटी जोन्स वय ७० वर्ष, एकूण  ६७ एकर शेळ्या-मेंढ्यांचे शेत सांभाळतात. येथे  ६ खोल्या आहेत  आणि  पर्यटकांची  भरपूर  आवक असते.

३. इंटरनॅशनल स्कूल ऑफ सस्टेनेबल टुरिझम – फिलिपिन्स  –   डॉ मीना गाबोर ७० वर्ष – माजी प्रधान सचिव पर्यटन , फिलिपिन्स सरकार- २०१४ मध्ये फिलपीन्स देशात कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात सिहांचा वाटा उचलला.

४. हाईडआवे एक्सपीरेन्स बालकेलों फार्म्स स्कॉटलंड – कॅरोलिन मिल्लर -स्वतः कृषी पर्यटन केंद्र चालवतात तसेच  ‘ गो रूरल स्कॉटलंड’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी  कृषी पर्यटन विकास साधला आहे.

५. ऍग्री टुरिझम साऊथ आफ्रिका -जॅककुई टेलर –  ऍग्री टुरिझम साऊथ आफ्रिका या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशात कृषी पर्यटन विकास त्यांनी मोलाचा वाटा  उचलला आहे.

६. कोबाती – कॉम्युनिटी बेनिफिट टुरिझम – युगांडा – मारिया बर्यामुजूरा – पर्यटन आणि सामाजिक बांधीलकी माध्यमातून महिला बचत गट सथापन करून आर्थिक , सामाजिक विकस करीत आहेत.

७. मेहेर कृषी पर्यटन केंद्र – सौ नंदा कासार , यवत पुणे , २७ एकर कृषी पर्यटन केंद्र चालवतात.  या  उपक्रमाद्वारे त्यांनी  ग्रामीण महिला बचत गट यांना रोजगार तसेच आर्थिक साधन उपलब्ध करून दिले.

८. निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र मोरगाव बारामती – सौ संगीत भापकर – ५ एकर शेतीत कृषी पर्यटन केंद्र चालवतात.

९. दीर्घायु कृषी पर्यटन केंद्र बिरवाडी शहापूर ठाणे – सौ डॉ अश्विनी कोटकर -यांच्याकडे  ४५ एकर आंब्याची बाग असून येथे  नैसर्गिक पद्धतीने  आंबे पिकवले जातात.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन देखील  आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे जागतिक कृषी पर्यटन पुरस्कारास पात्र ठरला आहे. महाराष्ट्र राज्य  कृषी पर्यटन  धोरण राबवणारे पहिले  राज्य  ठरले. इतकेच नव्हे तर या धोरणांतर्गत अनेक ग्रामीण भागातील शेतकरी पुरुष व महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.