संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून युवा स्वाभिमान व भाजप महिला आक्रमक

0

अमरावती(Amravati) :अमरावती येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात खा. संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर चांगलीच टीका केली. ही टीका करताना संजय राऊत यांनी बरेच आक्षेपार्ह शब्द वापरल्याने काल रात्री भारतीय जनता पक्ष व युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध केल्यानंतर युवा स्वाभिमानच्या माजी नगरसेविका सुमती ढोके यांच्यासह 34 महिलांच्या सह्यांची तक्रार गाडगे नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. संजय राऊत यांच्यावर महिलेचा अपमान केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली असून खा. राऊत यांच्या वक्तव्याची तपासणी केली जाईल व नंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.