ग्रीन जिमवरून जिल्ह्यात तापले राजकीय वातावरण

0

 -खा कृपाल तुमाने म्हणतात, चौकशी करा

(Nagpur)नागपूर : जिल्हा परिषदेने कौशल्य विकासअंतर्गत जिल्ह्यातील १० ते १२ गावांमध्ये ग्रीन जिम लावण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच या कामाला अनेक जीप सदस्यांचा विरोध आहे. ग्रीन जिम हे कौशल्य विकासच्या लेखाशिर्षात येत नसल्याचे (Congress)कॉंग्रेस नेत्यांचे स्पष्ट म्हणणे आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात जिल्हा खनिज कल्याण निधी हा आरोग्य सुविधांवर खर्च करण्याऐवजी सुमारे १३ कोटी रुपयांची उधळपट्टी ग्रीन जिमवर करण्यात येणार असून हे काम नियमबाह्य असल्याची शंका गेल्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले (Kishore Gajbhiye)किशोर गजभिये, (Gajju Yadav)गज्जू यादव या काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करून यावर (

(Krupal Tumane)खासदार कृपाल तुमाने यांनी उत्तर देण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. आता तुम्हाला शंका असेल तर एसआयटीमार्फत चौकशी करा, असे आव्हान रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते (Uday Singh Yadav)उदयसिंह यादव आणि किशोर गजभिये यांनी सांगितले, की या खनिज निधीसाठी खासदार तुमाने यांनी दोनदा शिफारस पत्र दिले. त्यांच्याच पत्रावरून एजंसी बदलण्यात आली. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत कौशल्य विकासासाठी (Ramtek)रामटेक, (Umred)उमरेड, (Kuhi)कुही, (Bhiwapur)भिवापूर, (Kamathi)कामठी, (Mauda)मौदा, (Nagpur Rural)नागपूर ग्रामीण, (Parashivani)पारशिवनी, (Sawner)सावनेर, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील २०० गावांमध्ये ग्रीन जिम लावण्यास मंजुरी देण्यात आली
खासदार तुमाने यांच्या पत्रावर या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकारी विमला यांनी मंजुरी दिली. ग्रीन जिम लावण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना नोडल एजंसी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर खासदार तुमाने यांनी पत्र देऊन जिल्हा परिषदेकडे हे काम देण्याची सूचना केली होती.