घरगुती ग्राहकांना जबर ‘शॉक’

0

10 ते 34 टक्क्यांपर्यंत दरवाढ

नागपूर (NAGPUR) महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली आहे. एमईआरसीसह महावितरणनने (Mahadiscom) 2023 -24 वर्षासाठी 2.9 टक्के आणि 2024-25 वर्षासाठी 5.6 टक्के दरवाढीचा दावा केला आहे. प्रत्यक्षात अधिभार जोडल्यास घरगुती ग्राहकांवर 10.48 ते 34.82 टक्के अतिरिक्त बोजा पडणार आहे. म्हणजेच नवीन आर्थिक वर्ष घरगुती ग्राहकांना वीजदरवाढीचा जबर शॉक (Heavy shock of electricity price hike to domestic consumers ) देणारे ठरणार आहे. महावितरणने 67,643 कोटींची तूट भरून काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. प्रत्यक्षात 39,563 कोटींची तूट ग्राह्य माणून दरवाढीला परवानगी दिल्याचे एमईआरसीचे म्हणणे आहे. पण, महावितरणकडून दिली गेलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात दरवाढ यात मोठी तफावत असल्याचा दावा या क्षेत्रातील अभ्यासकांनी केली आहे. विविध व्यासपीठांवरून वेगवेगळी आकडेवारी मांडली जात आहे. पण, वहन आकार आणि स्थिर आकार जोडल्यास वीजबिलात मोठा बदल दिसूनय येईल, यावर सारेच ठाम आहेत. पहिल्यावर्षी घरगुती ग्राहकांवर पडणारा भार स्लॅबनुसार 18.47 ते 26.72 टक्के असेल. याचप्रमाणे 2024-25 या वर्षात पडणारा भार 24.84 ते 34.82 टक्के असणार आहे.

खिशावर 52 टक्क्यांपर्यंत भार
वीज क्षेत्रातील काही अभ्यासकांनी तर ही दरवाढ 10 ते 52 टक्क्यांच्या घरात असल्याचा दावा केला आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार हा सध्याचा दर आहे असे गृहीत धरून दरवाढीचे आकडे कमी दाखवलेले आहेत. प्रत्यक्षात ही सर्वसामान्य वीज ग्राहकांची फसवणूक आहे. कोणतीही तुलना ही मागीला आदेश आणि नवीन आदेश यामधील फरक या आधारेच झाली पाहिजे. महावितरणकडून दिली गेलेली आकडेवारी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी असल्याचाही आरोप केला जात आहे.

 

वीजग्रहकांवर प्रचंड वीज दरवाढ लादली गेली आहे. निकालाच्या विरोधात विद्युत अपीलीय प्राधिकरणाकडे अपील करणार आहे. ही दरवाढ वाढ ही अत्यंत बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने झाली आहे. ग्राहकांना दिलासा मिळवा या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे होगाडे यांनी म्हटले आहे.
-प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
…………
तुलनात्मक दरवाढ
स्लॅब (यु) सध्याचे दर नवी दर टक्के 2024-25 टक्के
0-100 4.71 5.58 18.47 5.88 24.84
100-300 8.69 10.81 24.40 11.46 31.88
301-500 11.72 14.78 24.40 15.72 34.13
500-1000 13.21 16.74 26.72 17.81 34.82
…………………….
वहन आकार(रु) स्थिर आकार (रु)
सध्या 1.35 105
नवे 1.17 116
2024 1.17 128

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा