
नागपूर(Nagpur) दि. 11 एप्रिल 2026 :- थोर समाज क्रांतिकारक, यशस्वी उद्योजक, प्रखुर विचारवंत आणि दीन-दलितांसह शेतकरी व बहुजन समाजाचे उद्धारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज महावितरणच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्ग येथील ‘विद्युत भवन’ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी बोलताना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षणविषयक अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात राकेश सयाम यांनी महात्मा फुले यांच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले, प्रभारी कार्यकारी अभियंता अजित जिचकार आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरणचे विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेचे दर्शन घेऊन महामानवास विनम्र अभिवादन केले.
फोटो ओळ: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व अन्य अधिकारी-कर्मचारी.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर



















