
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने कवी, लेखक राजन लाखे लिखित ‘गझलायन’ या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, 16 जानेवारी 2024 रोजी विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार असून गझलसंग्रहाचे प्रकाशन साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा आशा पांडे यांच्या हस्ते होईल. यावेळी साहित्य दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते, तसेच वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते होईल. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे (Vidarbha Sahitya Sangha)अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.