बस्तरच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार 

0

बस्तरच्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार

दोन पोलिस जवान शहीद

वर्षभरात १०५ नक्षल्यांच्या खात्मा

रायपूर : छत्तीसगड राज्यातील बस्तर परिसरात दंतेवाडा नजिक गुरुवारी झालेल्या दोन चकमकीत एक जवान शहीद तर २६ नक्षलवादी ठार झाले आहेत.

 

दंतेवाडा सीमेजवळील विजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याआधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी या नक्षलवाद्यांना घेरण्याच्या दृष्टीने प्लान तयार करण्यात आला. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आणि पोलीस व नक्षलवादी यांच्यात चकमक झडली.

 

छोटेबेठिया पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या कोरोस्कोडो गावाजवळ ही चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारात ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांकडून एक ऑटोमॅटिक रायफल आणि इतरही काही शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अन्य नारायणपूर जिल्ह्यातील अबुझामदच्या जंगलातही सुरक्षा दलाच्या माध्यमातून कारवाई सुरू असताना पहाटे ३ वाजता काही बंडखोरांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे एक जवान आणि एका अधिकार्‍याच्या डोळ्यात धूळ गेली. दोघांनाही बाहेर काढण्यात आले आणि ते सुरक्षित आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ही मोहिम अजूनही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

 

या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये सुमारे १०५ नक्षलवादी मारले गेले आहेत. ज्यामध्ये बस्तर भागातील ६९ माओवादींचा समावेश आहे. तसेच या मोहिमेदरम्यान एकूण १३ जवान आणि १६ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

 

बस्तर रेंजचे आयजीपी सुंदरराज पी यांनी सांगितले की, दांतेवाडाच्या सीमेजवळ बिजापूर जिल्हातील गंगालूर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाच्या शोधमोहीमेदरम्यान सकाळी सात वाजता चकमक सुरू झाली. अनेक तासटर्यंत आपसात गोळीबार सुरू होता अशी माहिती

 

“गोळीबारात विजापूर जिल्हा रिझर्व्ह गार्डचा एक जवान शहीद झाला आहे. १८ माओवादी मारले गेले आहेत. या ठिकाणी स्फोटके आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली असून, शोध मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले

 

बस्तर भागातील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या एका चकमकीत चार माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या भागात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली, कांकेर जिल्ह्यातील डीआरजी आणि बीएसएफच्या संयुक्त दलांना मोहिमेसाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती कांकेर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आय कल्याण एलेसेला यांनी दिली आहे