गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघातात ३ महिला ठार, ३० जखमी

0

 

गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथून ट्रॅक्टरने परत येत असताना झालेल्या अपघातात तीन महिला ठार, तर ३० जण जखमी झाल्याची घटना रंगधामपेठा चेक गावाजवळ घडली(Accident in Gadchiroli District). शासनाने विविध योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रम चिटुर येथे आयोजित केला. हे लोक या जत्रेतून गावाकडे परतत होते. या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लक्ष्मीदेवपेठा येथील ३० जण ट्रॅक्टरमध्ये बसून चीटूरला गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास रंगधामपेठा चक गावाजवळ ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटले. यात ट्रॅक्टरमध्ये बसलेले तीन वृद्ध महिला ठार तर ३० जण जखमी झाले. त्यांना तत्काळ अंकिसा प्राथमिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील १५ ते १६ जणांना सिरोंचा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील जखमी लक्ष्मीदेवपेठा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.