९ वे राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशन संपन्न

0

■ या ओबीसी महाअधिवेशनातील सर्व ठराव मंजुर करण्यासाठी केंद्र सरकार कडे प्रयत्न करणार : राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर

■ अधिवेशन हे केवळ निमित्त मात्र आहे, देशातील कानाकोपऱ्यातील ओबीसी समाजात जागृती करणे हेतू आहे : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

■ अमृतसर येथील देशव्यापी नवव्या ओबीसी महाअधिवेशनात देशभरातून हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित

■ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशन पंजाब येथील अमृतसर (Amritsar)येथे संपन्न

■ अमृतसर येथील महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते

■ राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसर अधिवेशनामध्ये ३० मागण्यांचे ठराव पारीत

■ ओबीसी स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, पंजाब येथील अनेक ओबीसी योद्धयांचा सत्कार

■ राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, श्रीमती प्रतिभा धानोरकर (खासदार, महाराष्ट्र), डॉ. नामदेव किरसान, (खासदार, महाराष्ट्र), डॉ. परीनय फूके (विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र), महादेवराव जाणकर (माजी मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष), सुधाकर अडबाले (विधानसभा सदस्य, महाराष्ट्र), इंद्रजित सिंग (माजी राष्ट्रपती स्व. ग्यानी झेल सिंग इनके नातु), श्रीनिवास जाजूला (राष्ट्रीय अध्यक्ष, बी वेलफेअर असो., तेलंगाना व आंध्रप्रदेश), इम्तियाज जलील सईद (माजी आमदार, महाराष्ट्र), इटेला राजेंदर (खासदार, तेलंगाना) यांच्यासह देशभरातील ओबीसी नेते उपस्थित

■ ‘जो ओबीसी की बात करेगा, वही ‘देश पे राज करेगा’, ‘जय ओबीसी’, ‘जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’, ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’, ‘ओबीसी समाज की जय हो, हमारी हिस्सेदारी तय हो’, आदी घोषणांनी अधिवेशन गाजले.

चंद्रपूर (Chandrapur):

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन ( National Office of National OBC Federation)पंजाब येथील अमृतसर(Amritsa9thr)येथे ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या या महाअधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ३० मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले.

अमृतसर येथील या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर (Former Union Minister Hansraj is the Chairman of the National Commission for Backward Classes)यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.

या महाअधिवेशनात प्रमुख अतिथी स्वरूपात श्रीमती प्रतिभा धानोरकर (खासदार, महाराष्ट्र), डॉ. नामदेव किरसान (खासदार, महाराष्ट्र), इटेला राजेंदर (खासदार, तेलंगाना), रविचंद्र वड्डीराजु (खासदार, राज्यसभा, तेलंगाना), राजकुमार सैनी (माजी आमदार, हरियाणा), महादेवराव जाणकर (माजी मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ. परिणय फुके (विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र), सुधाकर अडबाले (विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र), अशोक बाथ (निवृत्त एसएसपी), इंदरजीत सिंग (माजी राष्ट्रपती स्व. ग्यानी झेल सिंग इनके नातु), श्रीनिवास जाजुला (राष्ट्रीय अध्यक्ष, बीसी वेलफेअर असोसिएशन, तेलंगाना एवं आंध्रप्रदेश), इम्तियाज जलील सईद (माजी आमदार, महाराष्ट्र), राजेंदर बिट्टा (माजी उपाध्यक्ष, वन विभाग, पंजाब), इंद्रजित सिंग बसारके (माजी अध्यक्ष, सैनी कल्याण बोर्ड, पंजाब), सतपाल सिंग सोखी (सिनेट सदस्य, पंजाब), भुवन भूषण कंवल, जसपाल सिंग खिवा, बबनराव तायवाडे (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ), विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र), सचिन राजूरकर (महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ), डॉ. अशोक जीवतोडे (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ), आदी ओबीसी समाजातील विविध सामाजिक तथा राजनीतिक क्षेत्रातील कद्दावर नेतागण उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांची आयोजनात महत्त्वाची भूमिका होती.

‘जो ओबीसी की बात करेगा, वही ‘देश पे राज करेगा’, ‘जय ओबीसी’, ‘जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’, ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’, ‘ओबीसी समाज की जय हो, हमारी हिस्सेदारी तय हो’, आदी घोषणांनी महाअधिवेशन गाजले.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर म्हणाले की, या ओबीसी अधिवेशनातील सर्व ठराव केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. धर्मांतर करणाऱ्यांना ओबीसी मध्ये समावेश करणे चुकीचे आहे. ५०% आरक्षण मर्यादा वाढविण्याची आता गरज आहे. देशातील प्रत्येकच राज्यात ओबीसींना २७% आरक्षण लागू नाही, म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात ओबीसींना २७% आरक्षण द्यावे, यासाठी आयोग आदेश देत आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी संपूर्ण ३० ठरावांचे वाचन केले व सभागृहात ते मंजूर करून घेतले. मंडल आयोग, नच्चीपण आयोग, स्वामिनाथन आयोग, आदी आयोगाच्या शिफारसी लागु व्हाव्या, अशी मागणी केली.

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षस्थानावरून म्हणाले की, दर वर्षी देशाच्या विविध भागात आम्ही ओबीसी महाअधिवेशन आयोजित करतो. अधिवेशन हे केवळ निमित्त मात्र आहे, या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यातील ओबीसी बांधावांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो. ओबीसी समाजात ऊर्जा व जागरूकता निर्माण करण्याचा हेतू असतो. शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी समाजासाठी लढत राहू.

राज्याच्या सर्व शाखांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना लोकसंख्येच्या योग्य प्रमाणात आरक्षण व प्रतिनिधीत्व देण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी, ४ मार्च २०२१च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी घटनेच्या कलमात सुधारणा करावी किंवा २७ टक्के लागू करावे, ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ५०% आरक्षणाची मर्यादा दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, क्रिमिलेअरची मर्यादा १३ सप्टेंबर २०१७ पासून वाढलेली नाही, याबाबतची अट मागे घेईपर्यंत मर्यादा २० लाख रुपये करावी, महात्मा फुले दांपत्यांना भारतरत्न द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी अशा ३० मागण्यांचे बाबतीत महाअधिवेशनात सर्वसंमतीने ठराव घेतले. आता ते केंद्र तथा राज्य सरकारला पाठवून ओबीसी संघटनांद्वारे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर म्हणाले की, निवडणुका आल्या की ओबीसी बाबत बोलल्या जाते, मात्र जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी लोकप्रतिनिधी बोलत नाहीत.

अधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच पंजाब येथील अनेक ओबीसी योद्धयांचा सत्कार करण्यात आला.

स्वागतपर भाषण माजी राष्ट्रपती स्व. ग्यानी झेल सिंग यांचे नातु इंदरजित सिंग यांनी केले. प्रस्तावना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी समोचीत मार्गदर्शन केले.

या देशव्यापी ओबीसी अधिवेशनात देशभरातून हजारो ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

शरद वानखेडे, शकील पटेल, प्रा. शेषराव येलेकर, प्रा. सुधाकर जाधवर, जाजुला श्रीनिवास गौड, किरण पांडव, केसना शंकरराव, मुकेश नंदन, गुनेश्वर आरीकर, सुषमा भड, एड. रेखा बारहाते, सुभाष घाटे, प्रकाश भागरथ, दिनेश चोखारे, चेतन शिंदे, कल्पना मानकर, श्याम लेडे, अनिल नाचपल्ले, नितीन कुकडे, सतपाल सुखी, प्रकाश साबळे, मधू नाईक, पुरुषोत्तम पाटील, लांबट, रविकांत वरारकर, आदींनी यशस्वीतेकरीता प्रयत्न केले.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा