वन्यजीव प्रेमींचे चक्क पिंजऱ्यात बसून आंदोलन

0

 

अमरावती- गेल्या 15 दिवसापासून अमरावती शहरातील लोकवस्तीत बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, वनविभाग या बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरले असल्याने नागरिक दहशतीत आहेत. त्यामुळे अमरावतीचे वन्यजीव प्रेमी सागर मैदानकर यांनी अमरावतीच्या मुख्य वनरक्षक कार्यालयासमोर चक्क पिंजऱ्यात बसून आंदोलन सुरू केलं आहे. वनविभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारे बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे बिबट्या शहरात मोकाट फिरतोय व याचमुळे मी पिंजऱ्यात बसून आंदोलन करत आहे. तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी सागर मैदनकर यांनी केली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा