गर्भवतीची विहिरीत उडी, पाण्यातच दिला मुलाला जन्म

0

बाळ –बाळंतीनीचा मृत्यू ; चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना


चंद्रपूर. नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने विहिरीत उडी घेतली. विहिरीतच तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर पाण्यात बुडून बाळ-बाळंतीनीचा मृत्यू झाला (Mother and baby died in well) धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सूमठाणा (Sumthana) येथे शनिवारी घडली. चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrpur) घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. महिलेची मानसिक अवस्था ठिक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, जिल्ह्यातील सूमठाणा येथील निकिता ठेंगणे या गर्भवती महिलेने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतल्या नंतर पाण्यात प्राणांतिक वेदनेने ती तडफडत असतानाच पाण्यातच प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला होता. मात्र पाण्यात बुडाल्याने महिलेचा व नवजात बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.
महिलेने विहिरीत उडी घेतल्याने आणि आतच प्रसूती झाल्याने ती आणि मुलगा पाण्यात बुडाले. त्यातच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी नवजात बाळ आणि बाळाच्या आईला बाहेर विहीरीतून बाहेर काढले आहे. निकिता ठेंगणे (२७) असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे निकिता हिचा पहिला मुलगा एक वर्षातच मरण पावला होता तर आठ महिन्याच्या मुलीचा पाळण्यातच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शनिवारच्या रात्री उशिरापर्यंत विहिरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र नवजात बालक विहिरीच्या तळाला गेले असल्याने आज पहाटेला नवजात बालकाचे शव बाहेर काढण्यात आले. निकिता हिला पहिला मुलगा झाला होता. मात्र एक वर्षाचा असतानाच त्याचा मृत्यू झाला. दुसरी मुलगी झाली ती आठ महिन्याची असताना तिचा पाळण्यातच मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे निकिता खचली होती. त्यामुळं मानसिक तणावातून तिने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा