अरविंद केजरीवालांचा १० दिवस नागपूर जिल्ह्यात मुक्काम

0

म्हणाले, हा राजकीय दौरा नाही, विपश्यनेसाठी आलो आहे


नागपूर. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख (Aam Aadmi Party) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) नागपूर (Nagpur) भेटीवर आले आहेत. शनिवारीच त्यांचे आमगन झाले. ते पुढील १० दिवस नागपूर जिल्ह्यातच मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ते कुठल्याही राजकीय कारणासाठी आले नसून विपश्यना शिबिरामध्ये (Vipassana camp ) १० दिवस सहभागी झाले आहेत. ‘पुढील काही दिवस आपण विपश्यना साधना आपण करणार आहोत’, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. केजरीवाल म्हणाले की, वेळ मिळतो तेव्हा विपश्यना साधना करतो. जवळपास १९९६ पासून विपश्यना साधना करीत आहे. दर वर्षी काही दिवस मोकळा वेळ मिळतो तेव्हा विपश्यना साधना करतो. विपश्यना साधना ही भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शिकवली होती. या विपश्यना साधनेच्या माध्यमातून आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक लाभ मिळतो, असे ते म्हणाले.


विपश्यना साधनेमुळे वैयक्तिक फायदे झाले आहेत. त्यामुळे दर वर्षातून मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विपश्यना साधना मी करतो. खरे तर प्रत्येकाने एकवेळा विपश्यना ध्यान केले पाहिजे. आपल्या देशात विपश्यनेचे अनेक केंद्र आहेत. त्यापैकी नागपूर एक आहे. मागच्या वेळी विपश्यना करण्यासाठी जयपूरला गेलो होतो. मात्र यावेळी नागपूरमध्ये विपश्यना सुरू असल्याने मी इकडे आलो असून पुढील काही दिवस आपण विपश्यना साधना आपण करणार असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.
देशात सध्या आम आदमी पक्षाची चांगली घौडदौड सुरू आहे. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता देशभरात आम आदमी पक्ष हळूहळू वाढताना दिसत आहे. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील’आप’ने नशीब आजमावले. त्यामुळे आता हळूहळू ‘आप’ राष्ट्रीय राजकारणात उतरताना दिसत आहे. गुजरातच्या निवणुकीत राष्ट्रीय पक्ष म्हणून आपला मान्यता मिळाली.