Home Breaking news सहा महिन्याच्या बाळाने गिळली काजळाची डबी… पुढे काय घडलं ?

सहा महिन्याच्या बाळाने गिळली काजळाची डबी… पुढे काय घडलं ?

0

 

चंद्रपूर (Chandrapur) 2 ऑगस्टला सकाळच्या सुमारास बाबूपेठ भागातील मंजुषा मेश्राम या आपल्या 8 महिन्याचा बाळा सोबत बसून होत्या, निरागस बाळ खेळत असताना त्यांच्या हातात काजळाची डबी लागली, आई ला वाटलं तो खेळत आहे, मात्र त्याने नकळत ती डबी तोंडात टाकत गिळून टाकली, आईने ती डबी काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, गळ्यात डबी अडकल्याने बाळ रडू लागले, मात्र आई मंजुषा मेश्राम ह्यांनी तात्काळ शहरातील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ मनीष मुंदडा यांच्याकडे धाव घेतली, त्यांनी काही प्रयत्नात ती डबी बाहेर काढली आणि बाळाचा जीव वाचला.

एका काजळाच्या डबीने कुटुंबाचा जीव टांगणीला लावला. चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागामध्ये असलेल्या मेश्राम परिवारातील बाळाने खेळताना काजळाची डबीच गिळली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. चंद्रपूरच्या कान -नाक- घसा तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी ती डबी अलगद बाहेर काढली.

श्वासनलिकेत अडकलेली ही डबी क्लिष्ट ठिकाणी असली तरीही बाळाचा श्वास मात्र सुदैवाने सुरू राहिला. त्यामुळे बाळ बचावले. वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने हे शक्य झाले. अन्यथा अनर्थ ओढविला असता. ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत तिथे सहज तोंडात टाकण्यासारख्या वस्तू पसरून न ठेवण्याचे आवाहन तज्ञांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे.नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहे. लहान मुले असलेल्या घरांमध्ये सहज तोंडात टाकण्यासारख्या वस्तू पसरून न ठेवण्याचे तज्ज्ञांनी आवाहन केलेले आहे.