राज्यात गोवर नियंत्रणासाठीही टास्क फोर्सची स्थापना होणार

0

मुंबई : राज्यात गोवर आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्स (State government to form Measles Task Force) स्थापन केला जाणार आहे. आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील व त्यात 11 सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या काळात स्थापन झालेल्या टास्क फोर्सने उत्तम कामगिरी बजावली होती. त्या टास्क फोर्सने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष देताना नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावली होती. आता गोवरसाठीही टास्क फोर्सच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.


या टास्क फोर्सच्या टीममध्ये संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा समावेश राहणार असून टास्क फोर्सच्या स्थापनेनंतर नियमित बैठका घेऊन उपाययोजना ठरविल्या जातील आणि वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना अंमलात आणल्या जातील. गोवरचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत असून तेथे गोवरच्या रुग्णांची संख्या 346 इतकी आहे. तर संशयित रुग्णांची संख्या साडेचार हजारांच्या आसपास आहे. या आजारामुळे मुल दगावण्याचीही भीती असते. त्यामुळे बरेचदा गंभीर रुग्णांना आयसीयूत दाखल करावे लागते.

Shankhnaad News | Ep.46_चित्ता कटरा पनीर भुर्जी आणि अमृतसरी पनीर पकोडा