उद्धव ठाकरेंवर कारवाईचे संकेत, वक्तव्याची सीडी मागविली

0

(Mumbai)मुंबई : मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जी कारवाई करण्यात आली, तीच कारवाई आता उद्धव ठाकरेंवर होणार का, यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे सीडी मागविण्यात आली असून कायदेशीर मतही घेण्यात येणार असल्याचे संकेत (Minister of State for Home Shambhuraj Desai )गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहेत.

गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे म्हणाले होते.

याबाबत आम्ही त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवली आहे. ही सीडी कायदेतज्ञांकडून तपासू आणि पुढील निर्णय घेवू. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काय केले होते, हे सर्वांनी पाहिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या घडामोडींमुळे राजकीय वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.