अदानी समूहाचा मोठा निर्णय! आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 शाळा उघडणार

0

अदाणी (Adani) समूहाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा देशभरात बनाव्यात. त्या शाळांमध्ये सर्व सामान्य मुलांना मोफत शिकता यावे या उद्देशाने अदाणी समूहाने 2000 कोटीची मदत देण्याची घोषणा केली आहे.

तसेच या रक्कमेतून देशभरात 20 शाळा नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारल्या जाणार आहेत. जेम्स एज्युकेशन या संस्थेबरोबर हा करार देखील करण्यात आला आहे.

या शाळांमध्ये 30 टक्के जागा या दारिद्र रेषेखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार असल्याची माहिती अदाणी समूहाच्या अदाणी फाऊंडेशनने दिली आहे.

कारण समाजातील सर्व वर्गातील लोकांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळाव्यात ही प्राथमिकता असल्याचं अदानी समूहाने स्पष्ट केलं आहे.