‘ऐ मेरे प्‍यारे वतन’ ने जागविला राष्ट्राभिमान

0

‘स्‍वरतरंग’तर्फे वीरमाता व वीरपत्‍नींचा सत्‍कार

(Nagpur)नागपूर, ९ ऑगस्‍ट २०२३
आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘ऐ मेरे प्‍यारे वतन’ या संगीतमय हिंदी मराठी देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाने दमदार प्रस्तुती देऊन राष्ट्राभिमान जागविला. यावेळी शहीद सैनिकांनी देशासाठी दिलेल्‍या योगदानाबद्दल त्‍यांच्‍या वीरमाता व वीरपत्‍नींचा सत्‍कार करण्‍यात आला.

स्‍वरतरंग संगीत अकादमी प्रस्‍तुत ‘ऐ मेरे प्‍यारे वतन’ हा देशभक्‍तीपर गीतांचा कार्यक्रम आज बुधवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्‍हील लाईन्‍स येथे आयोज‍ित करण्‍यात आला होता.
‘जहाँ डाल डाल पर’ या सदाबहार देशभक्ती गीताने निरंजन बोबडे यांनी कार्यक्रमाची सुरवात केली. याशिवाय ‘मेरे देश की धरती’ हे गीत निरंजन आणि कोरस गायक यांनी सादर केले. ‘सुनो गौर से दुनियावालो’ हे जोशपूर्ण गीत निरंजन, आयुषी आणि अनघा यांनी गाऊन युवकांना ठेका धरायला भाग पाडला. ‘रंग दे बसंती’, ‘कर चले हम फिदा’ ही गीते सादर करून निरंजन आणि सहकलाकारांनी सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमात ‘बाजी प्रभू देशपांडे’ यांच्यावर डॉ अभिजित अंभईकर यांनी एकांकिका सादर केली. त्याला श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. ‘उठा राष्ट्रवीर हो’ या गीतावर बालकांच्या समूहाने आकर्षक प्रस्तुती दिली. पार्वथी यांनी ‘ ऐ मेरे वतन के लोगो’, ‘वंदे मातरम’ सादर करून श्रोत्यांना भावनिक साद घातली. सचिन डोंगरे यांच्या चमूने सुंदर नृत्यविष्कार सादर केला. ‘ये देश है वीर जावनो’ या गीतावर नृत्य आणि गीताचे सादरीकरण झाले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

150 कलावंतांचा सहभाग असलेल्‍या या कार्यक्रमाची संकल्‍पना स्‍वरतरंग संगीत अकादमीचे संचालक व प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांची होती. कार्यक्रमाचे ओघवते निवेदन श्‍वेता शेलगावकर यांनी केले. या कार्यक्रमाला मेडिट्रीना सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. रसिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले.

देशसेवेला सलाम

राष्ट्र- प्रथम हे ध्येय ठेवून प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे न बघणाऱ्या वीर जवानांचे आणि त्यांच्या कुटुबियांचे देशाप्रती मोठे बलिदान राहिले आहे. वीर जवानांच्या या बलिदानाला सलाम करण्याकरिता त्यांच्या माता व पत्नींचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात वीर सैनिक लेफ्ट. (Amol Chaudhary)कर्नल अमोल चौधरी, (Smita Shashikant Junghare)स्मिता शशिकांत जुनघरे, (Kalpana Sunil Nakhate)कल्पना सुनील नखाते आणि (Indumati Tejrao Dandi)इंदुमती तेजराव दंदी यांचा समावेश होता. (Renowned neurosurgeon Dr. Meditrina Social Welfare Foundation. Sameer Paltewar)मेडिट्रीना सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. समीर पालतेवार, (Singer Niranjan Bobde) गायक निरंजन बोबडे, (Swartarang founder Raghunath Bobde) स्वरतरंग संस्थापक रघुनाथ बोबडे यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.