नागपुरात दिवसा विमानांचे आवागमन बंद

0

सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान विमानसेवा बंद

नागपूर एअरपोर्ट  (Nagpur Airport)
नागपूर : विधानसभा निवडणुकीमुळे नागपूर विमानतळाच्या रनवे रिकार्पेटिंगचे काम थांबले होते. मात्र, निवडणुका संपताच हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानसेवा बंद राहणार आहे. रनवे रिकार्पेटिंगचे काम ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विमानतळावरील रनवे रिकार्पेटिंगचे काम सुरू

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रनवे रिकार्पेटिंगचे काम विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावरील विमानसेवा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बंद राहणार आहे. निवडणुकीच्या काळात व्हीआयपी मुव्हमेंटमुळे हे काम बंद पडले होते. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही या कामावर परिणाम झाला होता. मात्र, तेही पावसाळ्यामुळे पुढे ढकलावे लागले. यानंतर १ ऑक्टोबरपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा थांबवावे लागले होते. आता ते पुन्हा सुरू झाल्याने कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.