गुरु गोविंदसिंग स्पोर्ट्स कॉलेज, लखनऊ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे १७ वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुमारी जान्हवी हिरूडकर हिने ‘बेस्ट अॅथलेट ऑफ द टुर्नामेंट’ चा किताब पटकावला. 37 वर्षानंतर प्रथमच हा किताब महाराष्ट्राच्या खेळाडूला प्राप्त झाला आहे.
जान्हवीने या स्पर्धेत 800 मीटर व 1500 मीटर मीटर धावणे या प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले केले. 800 मीटर हे अंतर तिने २.१३.६४ मिनिटात तसेच १५०० मीटर ४.३५.३१ मिनिटात पूर्ण केले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात सहभागी होण्याकरीता डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुद्धा जान्हवीला ८०० मीटर व १५०० मीटर धावणे या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले होते. राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर जान्हवीची लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झालेली होती.
जान्हवी नागपुरातील श्रीमती दादीबाई देशमुख हिंदुंची शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी वर्गाची विद्यार्थिनी असून जान्हवी शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री अशपाक शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असते.
२०२४ मध्ये जान्हवीला आता पर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत एकूण चार सुवर्णपदक प्राप्त झालेली आहेत. जान्हवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र फडणवीस सर व अध्यक्षांच्या प्रतिनिधी सौ सीमा फडणवीस मॅडम यांनी अभिनंदन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माया बमनोटे मॅडम उपमुख्याध्यापक श्री आष्टीकर सर पर्यवेक्षक श्री बोबडे सर त्यांनी सुद्धा जान्हवीचे या यशाबद्दल कौतुक केले आहे. व पुढील भविष्याकरीता सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.