Home Breaking news अजय बिवडे पीआरजीआय प्रेस असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी

अजय बिवडे पीआरजीआय प्रेस असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी

0

नागपूर : पीआरजीआय रजिस्टर्ड स्टेकहोेल्डर्स शिल्ड (प्रेस) असोसिएशन ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत देशातील प्रथम नोंदणीकृत संस्था आहे़ या असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दैनिक सिंहवाणी वृत्तचे संस्थापक-संपादक अजय बिवडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे़ अजय बिवडे हे मागील १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे़ वर्ड्स अँन्ड व्हूज या नागपुरातील संस्थेच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारीही ते सांभाळत आहे़
त्यांच्या या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ संपादक ल़त्र्य़ जोशी, ज्येष्ठ संपादक विनोेद देशमुख, ज्येष्ठ संपादक, लेखक श्याम पेठकर, शंखनाद न्यूजचे संपादक सुनील कुहीकर, दैनिक खबरबातचे संपादक-मिडीया सल्लागार अँड़ अव्दैत चव्हाण, माहिती व जनसंपर्कचे निवृत्त उपसंचालक रवी गीते, पत्रकार महादेव हरणे, पत्रकार पीयुष पाटील, पत्रकार पांडुरंग पांडे, महादेव सिरसाट यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.