अजितदादा म्हणाले ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना होना !

0

नागपूर- मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी मंत्री नवाब मलिक संदर्भात दिलेल्या पत्रावरही अधिवेशन संपताच रात्री मौन सोडले. त्या पत्राचे काय झाले असे विचारले असता,वारंवार माझ्या पत्राचा उल्लेख करण्याची गरज नाही. मी ते पत्र दिले व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मध्यस्थीने तो विषय संपला. असे सांगत’ ये मेरा प्रेम पत्र पढकर तुम नाराज न होना.. असेही अजितदादा म्हणाले.

दरम्यान कधीकाळी विरोधी पक्ष नेते असलेले तुम्ही तिघेही नेते सत्तेत आहात भविष्यात आणखी नवे विरोधी पक्षनेते तुमच्या सोबत येणार आहेत का, या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही ‘सरप्राईज’ देतो या शब्दात भविष्यातील संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.विदर्भात अधिवेशन होत असताना विरोधक विदर्भ विकासाच्या बाबतीत कुठलाही प्रस्ताव आणू शकले नाहीत शेवटी आम्ही स्वतः प्रस्ताव आणला. सिंचनाच्या बाबतीत विदर्भात 6000 कोटी रुपये यावर्षी खर्च होणार आहेत. यात गोसिखुर्दला 1500 कोटी आहेत. खूप काम अधिवेशनात झाले, जनतेचे प्रश्न सोडवण्यात आले असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.या अधिवेशनात एकही मिनिट कामकाज थांबले नाही, मंत्र्यांसाठी खोळंबले नाही आमची तयारी होती अधिवेशन वाढवण्याची मात्र विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्ताव दिला, त्यांचीच मानसिकता नव्हती 101 तास कामकाज झाले सरासरी कामकाज बघता 15 दिवस कामकाज झाले असे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले. दोन-तीन दिवसात वेळ मिळताच केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा यांची इथेनॉल दूध व इतर शेतकरी प्रश्नावर आम्ही तिघेही जाऊन भेट घेणार आहोत, मात्र आम्ही काही सांगेपर्यंत तुम्ही ,उगीच ठोकाठोकी करू नका असेही स्पष्ट केले.