जयंत पाटलांना फोन न केल्याबद्धल अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबईः ईडीकडून चौकशी झाल्यावर अजित पवार यांचा (NCP Leader Ajit Pawar on Jayant Patil) फोन आला नाही, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP President Jayant Patil) यांनी दिले. त्यावर आता अजित पवारांनीही स्पष्टीकरण देताना मी यापूर्वीही कोणालाही फोन केलेले नाहीत, असे स्पष्ट केले. जयंत पाटील यांची एकट्याची चौकशी झालेली नाही. यापूर्वी छगन भुजबळ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल या नेत्यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तेव्हादेखील मी कुठलेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी यावेळी देखील कुठलेच वक्तव्य केलेले नाही. तरीही या सगळ्यातून जाणीवपूर्वक वेगळाच अर्थ काढला जातो. मी कधीही कोणाबाबत बोलत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी आणखी यासंदर्भात सांगितले की, माझ्या कुटुंबातील व्यक्तींशी संबंधित २२ ठिकाणी धाडी पडल्या होत्या. तेव्हा मी माझे स्पष्टीकरण दिले आणि कामाला लागलो होतो. जयंत पाटील यांना फोन करण्यापेक्षा भेटल्यानंतरच आम्ही समक्ष बोलू ना. आम्ही ज्यावेळेस भेटू तेव्हा या सगळ्याबद्दल बोलू, असेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.