अजित पवारांनी केले मतदान

0

पुणे(Pune), 7 मे  भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय. अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आज बारामतीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी मतदान केल्यानंतर पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे म्हणत अजित पवारांनी टोला हाणला आहे.

अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी आरोर करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही.