काँग्रेसला बँक खाती ऑपरेट करण्याची परवानगी

0

 

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी-   इन्कम टॅक्स (प्राप्तीकर) विभागाने गोठवलेली काँग्रेस पक्षाची खाती आता ऑपरेट करता येणार आहेत. याप्रकरणी काँग्रेसने आयटी-ट्रीब्यूनलमध्ये धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना प्राप्तीकर अपिल न्यायाधीकरणाने पक्षाला बँक खाती ऑपरेट करण्याची परवानगी दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी, पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी आज, शुक्रवारीच पत्रकार परिषदेत सांगितले होते की, प्राप्तिकर विभागाने 2018-19 च्या आयकर रिटर्नच्या आधारे काँग्रेस आणि युवक काँग्रेसची खाती गोठवली आहेत.

 

तसेच प्राप्तिकर विभागाने या दोन खात्यांमधून 210 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत. काँग्रेसला क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जी काही रक्कम जमा झाली ती पक्षाच्या बँक खात्यात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षाचे खाते गोठवण्यात आले होते. हे लोकशाही गोठवण्यासारखे आहे. या खात्यात एक महिन्याचा पगारही जमा झाल्याचे माकन यांनी सांगितले. त्या देणगीदारांची नावेही आम्ही आयकर विभागाला दिल्याचे माकन यांनी सांगितले होते. यापत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने या प्रकरणी इन्कम टॅक्स ट्रिब्युनलकडे धाव घेतली. प्राप्तीकर अपिल न्यायाधीकरणाने काँग्रेस पक्षाची गोठवलेली बँक खाती वापरण्याची परवानगी दिली आहे. याप्रकणी काँग्रेसला तुर्तास दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याचे विवेक तन्खा यांनी सांगितले

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live