नागपूर : मानेवाडा बेसा परिसरातील रेवतीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी एका उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या दोन ऑक्सिजन सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाल्याने खळबळ उडाली. बॉम्बसारखाच आवाज ऐकून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर आले असता आकाशात धुराचे मोठे लोळ दिसले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाने (NMC) सांगितले. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रेवतीनगर येथील स्थानिक नागरिकांनी, ये- जा करणाऱ्यांनी स्फोटाचा हा आवाज ऐकला आणि आकाशात धुराचे लोट दिसले. घटनेनंतर बेलतरोडी पोलिस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा