पांढराबोडीतील संत रविदास सभागृहाचे उद्घाटन सुविधांसाठी मिळणार आणखी १० लाख

0

       नागपूर. पश्चिम नागपुरातील पांढराबोडीत श्री संत रविदास सभागृह (Shree Sant Ravidas Auditorium in Pandharabodi in West Nagpur) उभारण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thakre) यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले. सभागृहात अतिरिक्त सुविधांसह संरक्षक भिंतीसाठी आणखी १० लाखांचा निधी देण्याची घोषणा (Additional 10 lakhs announced ) आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. पश्चिम नागपुरचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी तत्पर आणि प्रयत्नशील असून विद्यार्थी, तरुण, युवक, ज्येष्ठ, महिला अशा प्रत्येक घटकांना अपेक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून समाजातील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हे सभागृह उभारण्यात आले आहे. पश्चिम नागपुरात अशाप्रकारे अनेक ठिकाणी सभागृह व अन्य विकासकामे सुरू असल्याची माहिती यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी दिली.

१६ लाखांच्या निधीतून श्री संत रविदास महाराज सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. आमदार विकास ठाकरे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे सभागृह समाजासाठी श्रद्धेचे स्थान ठरेल, असा विश्वास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना विकास ठाकरे म्हणाले की, प्रत्येकच व्यक्तीला आपल्या समाजाप्रती आपुलकी असते. समाजातील विद्यार्थी, युवकांना प्रगती साधता यावी, या तळमळीतून सामाजिक कार्यकर्ते धडपडत असतात. याच भावनेतून समाजातील कार्यकर्त्यांनी सभागृह उभारण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार या सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. सभागृहामुळे स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. येथे अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात असा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी आणखी १० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा ठाकरे यांनी केली.

स्थानिक प्रतिष्ठित नागरिक कवी तन्हा नागपुरी यांनीही सभागृहाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला. स्थानिक नागरिकांकाठी ही मोठी भेट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांना या सभागृहाचा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले.