मराठा आरक्षणप्रश्नी इंदेवाडीत रस्ता रोको

0
मराठा आरक्षणप्रश्नी इंदेवाडीत रस्ता रोको

 

जालना – जालना शहरातील इंदेवाडी येथे आज शनिवारी सकल मराठा बांधवांच्या वतीने जालना ते बीड या मुख्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ट्रॅक्टर आडवे लावत तसेच महिला वर्गांनी मुख्य रोडवर चुली पेटवून स्वयंपाक करत रास्ता रोको आंदोलन केले. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा आमदार खासदार आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यावा यासारख्या अनेक मागण्या घेऊन मराठा आंदोलकांनी हे आंदोलन आज इंदेवाडी येथे केले.

यावेळी आंदोलकांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, मागील एक तासापासून जालना ते बीड या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केले जाणार? कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस आमरण उपोषणामुळे खालावत चालली आहे. याची चिंता राज्यातील कोट्यवधी मराठा समाजाला लागलेली दिसत आहे.

राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा