‘स्वराज्याचे शस्त्रागार’ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन लक्षवेधी

0

 

बुलढाणा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर ‘स्वराज्याचे शस्त्रागार’ ही टॅगलाईन घेऊन शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या शस्त्र प्रदर्शनात धनुष्यबाण, तलवार, भाले यासह शिवकालीन नावीन्यपूर्ण शस्त्रे ठेवण्यात आली आहे. राकेश राव यांनी यावेळी उपस्थितांना या शस्त्रांची सविस्तर माहिती दिली. अजून दोन दिवस हे शस्त्रप्रदर्शन सुरू राहणार आहे. दरवर्षी बुलढाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने हे शस्त्र प्रदर्शन भरविण्यात येते.

या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून युवा वर्गासह शाळकरी मुलांना आपला देदीप्यान इतिहास तसेच संस्कृतीची माहिती व्हावी हा उद्देश असल्याचे राकेश राव यांनी सांगितले आहे. शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते झाले. शाळकरी मुले, नागरिक या शस्त्र प्रदर्शनीला भेट देत आहेत. तसेच बुलढाणा शहरात शस्त्र संग्रहालय निर्माण व्हावे अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live