कोण म्हणाले, हा निर्णय कायद्याला धरून नाही !

0

 

(Pune)पुणे- राजकारणात पक्ष उभे राहतात, पक्ष सोडून जातात, नवे येतात. देशात पहिल्यांदाच अस घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतले.पण हा निर्णय कायद्याला धरून आहे अस वाटत नाही, म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरचं लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

चिन्हाची काळजी करायची फार गरज नसते.१४ निवडणूक लढलो, ५ निवडणूकित चिन्ह वेगळ होते. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पहिल्या.कोणाला वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल मात्र असे कधी होत नसतं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही.
तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल येईल.

उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल.तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा, लोकांना विश्वास धीर द्या, यश नक्की मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी बोलून दाखविला.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा