National Handloom Day 2024 : पुरस्कार प्राप्त  विणकारांचा सत्कार

0
 खादी आणि ग्रामोद्योग  महामंडळाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता यांचे  राष्ट्रीय हातमाग   दिवसानिमित्त प्रतिपादन 
 
 नागपूर (Nagpur)7 ऑगस्ट 2024  हातमागाच्या उत्पादनांना  गत  वैभव मिळवून देण्यासाठी त्यांच्या मार्केटिंग करिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता यांनी आज केले . केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या नवीन सचिवालय भवन,सिवील लाइन्स स्थित  विणकर सेवा केंद्र, नागपूर  द्वारे आज 7 ऑगस्ट रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग   दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते  .
यावेळी   केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे,  विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक  संदीप  ठुबरीकर , सहायक संचालक महादेव पवनीकर  प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी विणकर सेवा केंद्र नागपूर कार्यालयाचे उपसंचालक संदीप ठुबरीकर यांनी सांगितले की, हातमागाचे कापड हे पर्यावरण दृष्ट्या शाश्वत असते आणि याच्या निर्मितीसाठी विजेची गरज लागत नाही . नागपूरच्या तांडापेठ , धापेवाडा  आणि अकोला येथील बाळापूर येथे 3 हातमाग क्लस्टरची निर्मिती करण्यात आली असून या मार्फत हातमागचे उत्पादन चालू आहे अशी माहिती त्यांनी दिली. 
 शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र हे विणकाम क्षेत्र होते परंतु आता हा विणकाम व्यवसाय लुप्तप्राय  होण्याच्या मार्गावर होण्याची चिन्ह दिसत आहे . यासाठी या क्षेत्रामध्ये नवीन संशोधनाशी  विणकारांनी अद्यावत राहावे असा  आवाहन सुधीर दिवे यांनी केले . विणकर  सेवा  केंद्राचे सहाय्यक संचालक महादेव  पवनीकर  यांनी विणकरांसाठी केंद्र शासनाद्वारे उपलब्ध असलेल्या असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .यामध्ये विणकरांसाठी ‘समर्थ’ प्रशिक्षण, हातमाग यंत्र   खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य,   विणकरांना  तांत्रिक सहाय्य करण्यासाठी  ‘बुनकर मित्र’  या टोल फ्री हेल्पलाइनची  सुविधा,  हातमाग वस्तूच्या विक्रीसाठी दिल्ली हाट तसेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रदर्शनाची उपलब्धता,   विणकरांसाठी वैद्यकीय सुविधा आणि विमा सुविधा या योजनांचा समावेश होता. 

या कार्यक्रमाप्रसंगी हातमाग वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले तसेच  केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे हातमाग क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त  विणकारांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला हातमाग विणकर, हातमाग निर्यातदार, उद्योजक, हातमाग व्यावसायिक आणि विणकर सेवा केंद्राचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. 
National Handloom Day 2024
National Handloom Day in Hindi
National Handloom Day Speech in English
National Handloom Day wikipedia
National Handloom Day UPSC
National Handloom Day PIB
National handloom day quotes
National Handloom Day Theme 2024

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा