Chndrashekhar Bawankule बावनकुळे यांनी केले शरद पवार यांना परिवारवादावरून लक्ष्य

0

 

Bawankule targeted Sharad Pawar for familyism

नागपूर Nagpur : देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठीच आहे. हे लोकांना माहीत आहे असा हल्ला BJP भाजपचे प्रदेशाध्यक्ष Chndrashekhar Bawankule  चंद्रशेखर बावनकुळे यांनी NCP राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष sharad pawar शरद पवार यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून केला आहे. बावनकुळे म्हणतात,पवार साहेब, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळावी म्हणून कोण राजकारण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे.Bawankule targeted Sharad Pawar for familyism 

मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिम न चालणारी  

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं. कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठीच आहे. हे लोकांना माहीत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे पण तुम्हाला ते बघवत नाही. म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.